बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी चौघे जेरबंद; दोघांनी मिळून केले तब्बल 44 वार : आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुले

पुणे- बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने सपासप वार करुन मंगळारी खून करण्यात आला होता.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस आणी गुन्हे शाखेने चारही आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. यातील मुख्य आरोपी वगळत इतर तीघेही अल्पवयीन मुले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेनदन अहवालात मुलीवर धारदार शस्त्राने तब्बल 44 वार झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले

ऋषीकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत(22,रा. सुखसागरनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. क्षितीजा अनंत व्यवहारे(14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. आरोपी शुभम हा तीच्या नात्यातील आहे.

-मोबाईल विकून खरेदी केली शस्त्र –
शुभम भागवतने मोबाईल विकून दोन तलवारी खरेदी केल्या होत्या. तसेच एक कोयता अगोदर घेऊन ठेवला होता. तो चालवत असलेल्या रोल पॉईंट स्नॅक सेंटरमधील एक धारदार चाकूनी त्याने सोबत घेतला होता. कोणी प्रतिकार करु नये म्हणून सोबत मिरचीची पुडही घेतली होती.

घटनेच्या दिवशी तो एका अल्पवयीन साथीदारासह दुचाकीवर बिबवेवाडी परिसरात आला. तर दुसरे दोन अल्पवयीन साथीदार ओला कॅबमधून शस्त्र असलेली सॅक घेऊन बिबवेवाडीत आले. यश लॉनच्या पायथ्यापासून शुभसह दोघे दुचाकीवर यश लॉनपाशी आले. तीथे शुभमने तीला कब्बडी खेळत असलेल्या ठिकाणाहून बाजूला घेतले. तीथे वाद झाल्यावर, त्याने चाकू काढून तीचा गळा चिरला तर त्याच्या साथीदाराने कोयत्याने तीच्यावर सपासप वार केले. तीची एक मैत्रिण तीला सोडवण्यास आली असता तीच्या कपाळाला सोबल आणलेले पिस्तूल लावून धमकावण्यात आले.

– घरच्यांनी शुभमची काही वर्षापूर्वी घातली होती समजूत –
शुभम काही वर्षापुर्वीपावून एकतर्फी प्रेमातूनक्षितीजाला त्रास देत होता. त्याला तीच्या घरच्यांनी आणी नातेवाईकांनी समजावले होते. तो तीच्या घरापासून एक घर सोडूनच रहात होता. त्याला समजावल्यानंतर तो तेथून पिंपरीला रहायला गेला. यानंतरही तो तीला फोन करुन संपर्क साधायचा प्रयत्न करत होता.

मात्र ती त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हती. पिंपरी येथे एका महाविद्यालयजवळ शुभमने रोल पॉईंट नावाने स्नॅक सेंटर चालवायला घेतले होते. तेथे गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे दोन साथीदार कामाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.