पैसे वाटताना चौघांना अटक

नगर  – संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरेगाव येथे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (दि.20) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने ही कारवाई केली. तसेच सोमवारी श्रीगोंदा तालुक्‍यातील टाकळी कडेवळीत दोघांना पैसे वाटप करताना पकडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

आबासाहेब मधुकर सोनवळ (रा. टाकळी, ता. करमाळा) व किसन शिवाजी जाधव (रा. पारवडी, ता. बारामती) या दोघांना भरारी पथकाने पकडले आहे. या दोघांकडे 20 हजार रुपयांची रोकड, मतदान प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत पत्र व मतदार यादी सापडली आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व बाहेरील राजकीय व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये, या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा मतदारसंघातील टाकळी कडेवळीत येथे घडली. येथे भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले. त्यांच्याकडून 14 हजारांची रक्कम जप्त केली आहे. या दोघांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.