हैदराबाद : हैदराबादमधील निर्भयाकांडातील चारही अरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले. दरम्यान या आरोपींना ठेवण्यात आलेल्या शादनगर पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव जमला होता. या जमावाने या आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या आरोपींना केवळ न्यायलयापुढे उभे करू नका. त्याने त्या मुलीला जसे मारले तसेच त्यांना मरण आले पाहिजे, तुम्हाला हे जमत नसेल तर त्याच्या ताब्यात आम्हाला द्या, असे एकाने पोलिसांना सुनावले. तर या घटनेच्या निषेध करणाऱ्या आणि या आरोपींच्या एन्काउंटर करण्याच्या मागणी करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता.
दरम्यान स्थानिक वकीलांच्या संघटनेने या आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. या आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती सामान्य असल्याचे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.