मालेगाव बॉम्बस्फोटातील चार आरोपींना जामीन मंजूर 

मुंबई – २००८ मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर  केला आहे. आरोपी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया या चौघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

या प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांच्या याचिकेवर २९ जुलै रोजी न्यायालय सुनावणी घेणार आहे.

दरम्यान, मालेगाव स्फोटातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावे, असे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.