शिरूर : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माईनगरी (बो-हाडे मळा) शिरूर येथे शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ गुरूवारी (ता.१४) रोजी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार(आदर्श सरपंच- हिवरे बाजार), नानजी भाई ठक्कर (ठाणावाला ) व इतर मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार असल्याची माहिती विनय सिंधुताई सपकाळ यांनी दिली.
समाजातील दानशूर व माई परिवारावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी सहकार्य केल्याने, आदरणीय माईंचे हे महान कार्य पुढे सुरू असून त्याचा शेकडो अनाथ लेकरांना फायदा होत आहे.
नागरिकांच्या प्रेमाच्या जोरावर शिरूर येथील अनाथ लेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘माईनगरी’ शिरूर येथील शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ बालदिन आणि आपल्या लाडक्या माईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरूवारी (ता.१४) रोजी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानिमित्ताने एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याची व रक्तदान शिबीरात सहभाग घेण्याची विनंती ” माईनगरी ” चे संचालक विनय सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.