केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत उद्या एटीसी टॉवरचा पायाभरणी सोहळा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 270 कोटी रूपये मंजूर झाले असून त्याअंतर्गत सर्व महत्त्वाची कामे सुरु झाली आहेत. येत्या वर्षभरात धावपट्टी, एटीसी टॉवर, विद्युतीकरण यासह इतर कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोल्हापूरचे ऐतिहासिक, व्यापारी आणि औद्योगिक महत्त्व पाहता येथील विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्‍यक असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये अधोरेखित केले होते.

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच विमानतळावरील विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नामदार प्रभू यांनी स्वत: उपस्थिती लावण्याची विनंती केली होती. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळावर नवीन टर्मिनल बिल्डींग आणि एटीसी टॉवरचा पायाभरणी सोहळा शनिवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी प्रभू यांच्या हस्ते होत आहे. येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण होतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

सध्या विमानतळावरून हैद्राबाद आणि बेंगलोरसाठी अलायन्स एअर या कंपनीची विमाने दररोज उड्डान घेत असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच उडान फेज 3 अंतर्गत कोल्हापूर-मुंबई हवाई सेवेला परवानगी मिळाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×