नवी दिल्ली – उत्तराखंड येथील नीम करोली बाबांच्या कैंची धाम आश्रमात भाविकांची वर्षभर गर्दी असते. बाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भाविक कैंची धाम आश्रमामध्ये येत असतात. कैंची धाम आश्रम हा नीम करोली बाबांच्या अनेक चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे.
दरवर्षी 15 जून हा दिवस कैंची धाम स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीही नीम करोली बाबा यांच्या आश्रमाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्याची तयारी जोरदार पद्धतीने सुरु आहे.
काय आहे कैंची धाम आश्रमाचा इतिहास?
नीम करोली बाबा यांनी 15 जून 1964 रोजी कैंची धामची स्थापना केली. तसेच या दिवशी हनुमनाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून 15 जून हा दिवस कैंची धाम स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली आहेत बाबांचे भक्त…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली हे दोघेही नीम करोली बाबा यांचे मोठे भक्त आहेत. तसेच परदेशातील फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचाही समावेश आहे.
लेखक रिचर्ड अल्बर्ट यांनी त्यांच्या ‘मिरॅकल ऑफ लव्ह’ या पुस्तकामध्ये नीम करोली बाबांच्या अनेक चमत्कारांबद्दल माहिती लिहिली आहे.
दरम्यान, 15 जून 2023 रोजी कैंची धाम स्थापना दिनानिमित्त दोन लाखांहून अधिक भाविक येथे पोहोचतील असा अंदाज वर्तण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.