कोणताही दोष नसताना ४३ वर्षे तुरुंगात; सुटका होताच लोकांनी केली तब्बल ११ कोटी रुपयांची मदत

वॉशिंग्टन : कोणताही दोष नसताना खुनाच्या आरोपाखाली तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढणाऱ्या एका निष्पाप माणसाची अखेर तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर अमेरिकेतील 20,000 सर्वसामान्य नागरिकांनी त्याच्या मदतीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा मदतनिधी जमा केल्याची घटना घडली आहे.

केविन स्त्रिकलांड असे या इसमाचे नाव असून अमेरिकेतील मीसुरी जेलमध्ये तो बंद होता.  गेल्या आठवड्यात त्याच्या अपिलावर सुनावणी झाली आणि त्यामध्ये त्याचे अपील मान्य करून त्याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इतके वर्षे अपराध नसतानाही तुरुंगात खितपत पडलेल्या केविनला कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश न्यायालयाकडून देण्यात आला नाही किंवा प्रशासनाने ही तसा निर्णय घेतला नाही.

 त्यामुळे तिथून बाहेर पडल्यावर जगायचे कसे हा मोठा प्रश्‍न त्यांच्या मनात निर्माण झाला त्यानंतर त्याला मदत करण्याबाबत एक ऑनलाइन मोहीम सुरू झाली आहे. त्यामध्ये तब्बल वीस हजार लोकांनी भाग घेऊन साडे चार लाख डॉलर म्हणजेच अकरा कोटी रुपये जमा केले. 1978 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणामध्ये केविनला अटक करण्यात आली होती. पण ह्या खून प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही असे केवीन सतत सांगत होता पण तरीही त्याला सतत तुरुंगातच राहावे लागत होते.

 गेल्या आठवड्यात त्याचा अपिलावर सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाच्या लक्षात आले की त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही तेव्हा त्यांनी त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला. 1978 मध्ये जेव्हा ही गोळीबाराची घटना घडली होती, तेव्हा केविन आपल्या घरात टीव्ही पहात बसला होता. या गोळीबाराच्या घटनेतून वाचलेली महिलाही कित्येक वर्षे साक्ष देण्यापासून लांब राहत होती.

 आपल्यावर पोलिसांचा दबाव आहे असे ती सांगत होती ही सर्व परिस्थिती मान्य करून न्यायालयाने केबिनचा कोणताही दोष नाही हे मान्य केले आणि त्याची निर्दोष मुक्तता केली. पण जेव्हा केविन कारागृहातून मुक्त झाला तेव्हा त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. बँक खाते नव्हते किंवा ओळखपत्र नव्हते त्यामुळे आगामी कालावधीमध्ये जगायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यानंतर या क्षेत्रात काम करणार्‍या मिडवेस्ट इनोसन्स प्रोजेक्टच्या स्वयंसेवक यांनी केविनला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि 20 हजार लोकांनी तब्बल अकरा कोटी रुपयांची मदत जमा केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.