लॉटरीवरील जीएसटीचे सुसूत्रीकरण करा

पुणे – लॉटरीवरील जीएसटी गुंतागुंतीचा असल्यामुळे देशभर एकच कर प्रणाली लागू होत नाही. त्यासाठी लॉटरीवरील जीएसटीचे सुसूत्रीकरण करण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.

लॉटरीच्या तिकिटावर देशभर समान म्हणजे 12 टक्‍के जीएसटी असावा. त्याचबरोबर जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेचा विक्रेत्याशी कसलाही संबंध नसतो. त्यासाठी त्यांना कर लागू नये, असे लॉटरी विक्रेता संघटनेचे नेते कमलेश विजय यांनी सांगितले. सध्या ज्या राज्याची लॉटरी आहे, त्या राज्यात लॉटरी तिकिटावर 12 टक्‍के कर आहे. मात्र, बाहेरच्या राज्यात लॉटरीची तिकिटे विकली गेल्यास त्यावर 28 टक्‍के कर लागतो. तो कमी करून सलग 12 टक्‍के कर करण्याची गरज व्यक्‍त करण्यात आली आहे.

त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अन्य राज्यांच्या अर्थमंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीने या विषयावर कायदेशीर सल्ला मागितलेला आहे. जीएसटी आधी लॉटरी तिकिटावर केवळ 6 टक्‍के कर होता. मात्र, त्यानंतर हा कर 18 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. सध्या महाराष्ट्रासह 10 राज्यांत लॉटरी तिकीट विक्रीला परवानगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.