इम्रान खान यांच्यावर पूर्वीच्या पत्नीचे टीकास्त्र

इस्लामाबाद – महिलांबाबत असभ्य वक्‍तव्य केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पूर्वपत्नीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बलात्कार, लैंगिक छळाच्या गुन्ह्यांचा संबंध महिलांनी परिधान करायच्या वस्त्रांशी जोडल्याबद्दल इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीने जोरदार टीका केली आहे.

देशात बलात्काराच्या घटनांमध्ये अश्‍लीलता वाढल्याचे कारण असल्याचे एका दूरचित्रवाणी मुलाखती दरम्यान, ऑक्‍सफोर्डमध्ये शिकलेल्या इम्रान खान यांनी म्हटले होते. भावना चाळवल्या जाऊ नयेत, यासाठी महिलांनी योग्य वस्त्रे घालण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. पडदा अथवा चेहरा झाकण्याची पद्धत भावना चाळवल्या जाऊ नयेत यासाठीच आहे, असेही ते म्हणाले होते.

मात्र त्यांच्या या वक्तव्यावर खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या घटनांची जबाबदारी पुरुषांवर असते. पुरुषांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. डोळे झाकून घ्यावेत आणि आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवावे, असे त्या म्हणाल्या. 

जेमिमा गोल्डस्मिथ यांचा विवाह इम्रान खान यांच्याबरोबर 1995 साली झाला होता आणि त्यांचा विवाह 2004 पर्यंत टिकला होता. इम्रान यांच्या वक्‍तव्याचा गैरअर्थ काढला गेला असेलही. पण जेवढे आपण इम्रान यांना ओळखते त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की नियंत्रण पुरुषांनीच ठेवले पाहिजे. महिलांनी नाही, असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.