अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपासून घसा दुखत असल्यामुळे त्यांनी करोनाची टेस्ट केली त्यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पंण झाले. करोनाचे दोन्ही डोस ओबामा व त्यांनी पत्नी मिशेल यांनी घेतले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ओबामा यांनी ट्विट केले की, “गेल्या दोन दिवसांपासून माझा घसा दुखत होता, पण मला बरे वाटत आहे.” “मिशेल आणि माझे करोना लसीचे दोन्ही डोस झाले आहेत आणि बूस्टर डोस मिळाला आहे.”