संयुक्‍त राष्ट्राचे माजी अध्यक्ष जेव्हियर पेरेझ डी कुएलर यांचे निधन

लिमा : संयुक्‍त राष्ट्राचे माजी अध्यक्ष जेव्हियर पेरेझ डी कुएलर यांचे आज निधन झाले. इराण-इराक दरम्यानच्या युद्धामध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ते विशेष प्रसिद्ध झाले होते. ते 100 वर्षांचे होते. पेरूमधील त्यांच्या मूळ गावी त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या मुलाने सांगितले. 

पेरेझ डी कुएलर यांनी 1981 ते 1991 पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यांना बऱ्याचदा व्यवसाय आणि स्वभावाने शांततावादी असेच संबोधले जात असे. जगातील भूके विरूद्धच्या लढाई, इराण आणि इराक दरम्यान आठ वर्षांचे युद्ध तसेच अमेरिक समर्थित एल साल्वाडोरमधील गृहयुद्धांदरम्यान संयुक्त राष्ट्र संघाचे नेतृत्व केले. पेरेझ डी कुएलर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने या सर्व प्रकरणांमध्ये शांतता चर्चेला सुरुवात झाली होती.

कुएलर हे युद्ध करणाऱ्या गटांमध्ये समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नांसाठी परिचित होते. इराण-इराक युद्ध समाप्त करण्यासाठी, लेबनॉनमध्ये अमेरिकन बंधकांना सुटका करून घेण्यासाठी आणि कंबोडिया व अल साल्वाडोरमधील शांतता करारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे संयुक्‍त राष्ट्राने म्हटले आहे.

त्यांनी आफ्रिकन खंडावरील शेवटची वसाहत असलेल्या 1990 च्या नामिबियाच्या स्वातंत्र्यास संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणून स्वतःची त्यांची सर्वात मोठी कामगिरी मानले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.