नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता. न्यायालयाने दिलेल्या याच निर्णयाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती आर.भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठ पी. चिदंबरम यांच्या नवीन याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देत पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी अशक्य असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे.