माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या कृष्णा तीरथ यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचे प्रभारी पीसी चाको आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थित दिल्लीती काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यालयात त्यांनी अधिकृत प्रवेश केला आहे.

यूपीए सरकारच्या कार्यकालात कृष्णा तिरथ या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री या पदावर कार्यरत होत्या.  2014 मध्ये त्यांनी उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी भाजपचे उमेदवार उदित राज यांनी त्यांचा पराभव केला होता.

2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी त्या नाराज होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.