औरंगाबाद – माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गायकवाड यांचा राजीनामा मराठवाड्यात भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी, “मी जयसिंगराव गायकवाड पाटील, भाजपाच्या कार्यसमिती सदस्यत्वाचा व प्राथमिक सदसत्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे एका ओळीच्या राजीनाम्याचे पत्र पाठवलंय.
याबाबत एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना गायकवाड यांनी, “पक्षनेतृत्वाने माझ्याकडे १० वर्षांहून अधिक काळ दुर्लक्ष केलंय, यामुळे मी नाराज आहे. यामुळेच राजीनामा देत आहे.” अशी भूमिका मांडली.
दरम्यान, गायकवाड यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, “भाजप हा उन्मादी पक्ष आहे. त्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे भाजपचा पराभव करू शकतील म्हणून त्यांच्या मागे कार्यकर्ते उभे करू,” अशी भूमिका मांडल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
Former union minister and BJP leader Jaisingrao Gaikwad Patil tenders his resignation from the party.
"I was not happy with the party leadership continuously neglecting me for over 10 years. So I have resigned from the party," says Jaisingrao Gaikwad Patil. pic.twitter.com/gf0HJ3Cxvl
— ANI (@ANI) November 17, 2020