ऍडलेड – ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व आयसीसीचे सामनाधिकारी बॅरी जर्मन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व चार मुले असा परिवार आहे.
एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून 19 कसोटी सामने खेळले. वॅली ग्राऊट यांच्या निवृत्तीनंतर तेच संघाचे सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नावारूपाला आले होते. 1959 साली त्यांनी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
बिल लॉरी जखमी असताना त्यांनी ऍशेस मालिकेतील एका कसोटीत संघाचे नेतृत्वही केले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 1969 साली झालेल्या मालिकेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते आयसीसीचे सामनाधिकारी म्हणून कार्यरत झाले होते.