सेऊल : दक्षिण कोरियाच्या माजी अध्यक्षा पार्क जेऊन हे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याचा फेरविचार करण्याचा निर्णय स्थानिक न्यायालयाने घेतला आहे. पार्क जेऊन हे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी आढळल्यामुळे 2017 साली त्यांना पदावरून खाली खेचण्यात आले होते.
त्यांना 25 वर्षांची शिक्षा आणि 20 अब्ज दक्षिण कोरियाई वोन इतका दंडही पार्क यांना ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात बळजबरीने आर्थिक लाभ मिळवणे, लाचखोरी आणि अधिकारांचा गैरवापर आदी आरोप होते.
पार्क यांच्याविरोधातील खटल्याची फेरसुनावणी करण्यात यावी, असे आदेश दक्षिण कोरियातील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार बुधवारी या खटल्याची फेरसुनावणी करण्यात येणार आहे.
प्रक्रियेतील काही मुद्दयांच्या आधारे ही फेरसुनावणी करण्यात येणार आहे.
पार्क या दक्षिण कोरियातील पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून पदावरून पायउतार व्हावे लागणाऱ्या त्या पहिल्या नेत्या आहेत.