मुंबई : विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल 12 वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे. सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत होते. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. दरम्यानच्या काळात ते राज ठाकरे यांच्या मनसेत सक्रिय होते.
मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. उपरकर यांनी शिवबंधन बांधले तेव्हा यावेळी शिवसेना नेते आमदार मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत उपस्थित होते.