निमोणे : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावातील माजी सरपंचाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या माजी सरपंचासाठी आणलेल्या केक वर “भावी आमदार” असा उल्लेख केलेला होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा माजी सरपंच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा कट्टर समर्थक आहे.
शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावचे माजी सरपंच ‘संजय काळे’ यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी जो केक आणला होता. त्यावर “भावी आमदार” असा उल्लेख होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय काळे यांच्या मातोश्री शालन काळे या घोडगंगा सहकारी कारखान्याच्या माजी संचालक आहेत. तर संजय काळे हे आधी निमोणे ग्रामपंचायतचे सदस्य, नंतर घोडगंगा कारखान्याचे संचालक आणि मग निमोणे गावचे सरपंच असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. तसेच शिरुरच्या पुर्व भागात संजय काळे यांचा मोठा गोतावळा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत संजय काळे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का…? हे येणारा काळचं ठरवेल.