माजी रणजीपटू चांदोरकर यांची वयाची शंभरी पार

मुंबई  – महाराष्ट्र आणि मुंबईचे माजी रणजीपटू रघुनाथ रामचंद्र चांदोरकर यांनी शनिवारी(21 नोव्हेंबर)  वयाची 100 वर्षे पूर्ण केली.  प्राध्यापक दिनकर बलवंत देवधर (पुणे) आणि वसंत रायजी (मुंबई) यांच्यानंतर चांदोरकर (डोंबिवली) हे वयाची शंभरी गाठणारे तिसरे रणजीपटू ठरले आहेत.

मधल्या फळीतील फलंदाज आणि लेगस्पिनर चांदोरकर यांनी 1943 ते 1947 दरम्यान पाच रणजी सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर ते मुंबईकडून दोन रणजी सामने खेळले. चांदोरकर सध्या डोंबिवलीत राहात आहेत. देवधर यांच्या नेतृत्वाखाली चांदोरकर हे एसपी महाविद्यालय आणि पीवायसी जिमखान्याकडूनही खेळले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.