नवी दिल्ली : प्रसिद्ध फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर फसवणूकीचा आरोप आहे.
रेलिगेअर इंटरप्राइजेस लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर 740 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
शिविंदर सिंग यांच्यासह पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित इतर तीन जणांनाही अटक केली आहे. दरम्यान शिविंदर सिंगचा मोठा भाऊ मालविंदर सिंग याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. मालविंदर सिंग यांचे देखील या प्रकरणात नाव आहे.
ईडीने ऑगस्टमध्ये मनी लॉंड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात रॅनबॅक्सी ग्रुपचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्या घरावर छापे टाकले होते. मनी लॉंड्रिंग कायद्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत छापा टाकण्यात आला होता.