नवी दिल्ली – राज्यसभेचे माजी खासदार आणि वरिष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे काल रात्री निधन झाले. राजधानी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चंदन मित्रा यांच्या निधनाची माहिती मुलगा कुशन मित्राने याने दिली आहे.
Former Rajya Sabha MP and senior journalist Chandan Mitra passed away late last night in Delhi, confirms his son Kushan Mitra.
(File photo) pic.twitter.com/MB7wlwL9Hi
— ANI (@ANI) September 2, 2021
चंदन मित्रा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय होते. 2010 मध्ये भाजपाकडून दुसऱ्यांदा चंदन मित्रा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. केंद्रात सत्ताबद्दल होऊन मोदी सरकार आले. त्यानंतर चंदन मित्रा यांना भाजपामध्ये फारशी संधी मिळत नव्हती.
चंदन मित्रा यांनी जुलै २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी णमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच ते ‘द पायोनियर’ चे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक सुद्धा होते.
दरम्यान, चंदन मित्रा यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करत शोक व्यक्त केला आहे.