शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्यावर मोहालीत उपचार सुरू होते. प्रकाशसिंग बादल यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या पीए यांनी ही माहिती दिली.
प्रकाश सिंह बादल यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास –
95 वर्षीय बादल यांना आठवडाभरापूर्वी श्वासोच्छवासाच्या तक्रारीनंतर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी श्री मुख्तार साहिब येथे झाला.
पद्मविभूषणने सन्मानित –
प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही काम पाहिले. प्रकाश सिंह बादल यांना 30 मार्च 2015 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री –
प्रकाशसिंग बादल हे 1970 ते 1971 आणि पुन्हा 1977 ते 1980 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर ते 1997 ते 2002 आणि 2007 ते 2017 पर्यंत पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. 1995 ते 2008 पर्यंत ते पक्षाचे अध्यक्ष होते.
राघव चढ्ढा यांनी व्यक्त केला शोक –
आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राघव चढ्ढा म्हणाले की, पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाच्या वृत्ताने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या मनापासून संवेदना.