नवी दिल्ली : कोलकातामधील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई सर्वोच्च वैद्यकीय संस्था आयएमएने केली आहे.
आयएमएने म्हटले की, या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्यात निष्काळजीपणाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डॉ. घोष यांनी त्यांच्या कृतींमुळे व्यवसायाची बदनामी केली असल्याने शिस्तपालन समितीने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
दरम्यान, पिडीत डॉक्टरांचा मृतदेह सापडल्यापासून डॉ. घोष केंद्रस्थानी आहेत. दुसरीकडे आर जी कर हॉस्पिटलमधील एका माजी कर्मचाऱ्याने डॉ. घोष यांच्यावर मृतदेह आणि बायोमेडिकल वेस्टची तस्करी केल्याचा आरोप केला आहे.