माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा हटवली

केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा हटवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेचा निर्णय पूर्णपणे प्रफेशनल आधारावर घेण्यात आला आहे. ठरविक वेळेनंतर सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतला जातो असेही या अहवालात म्हटले गेले आहे.

दरम्यान, आता मनमोहन सिंग यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. एसपीजी सुरक्षा सध्या देशातील फक्त चार जणांना दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, धोक्‍याची शक्‍यता असल्यास पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना सुद्धा एसपीजी सुरक्षा दिली जाते. दरम्यान, गेल्या महिन्यात देशातील काही नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने काही सर्वपक्षीय नेत्यांच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली आहे. त्यातच आता मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेतदेखील घट करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.