नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. आर्मी रुग्णालयाने याविषयीची माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
The condition of former President Pranab Mukherjee remains unchanged this morning. He is deeply comatose with stable vital parameters and continues to be on ventilatory support: Army Research & Referral (R&R) Hospital, Delhi https://t.co/JPhaOOoEvL
— ANI (@ANI) August 13, 2020
एका वृत्तसंस्थेने याविषयी ट्विट करुन माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले असल्याचे आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.