बारामती (प्रतिनिधी) – बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. विजयसिंह (बापू) धुमाळ (वय ६५) यांचे आज दि.(19 )रोजी दुःख निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
वकिली क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. सत्य, प्रमाणिकपणा, न्याय यांना प्रमाण मानून त्यांनी अविरत काम केले. त्यांनी घालून दिलेला आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे. बारामती वकील संघटनेचे भिष्माचार्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. वकील संघटनेचे निवडणुकीच्या काळात त्यांचा सल्ला अंतिम मानला जात.
ज्युनिअर वकिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असत त्यामुळे ज्युनिअर वकीलांबरोबाबर त्यांची विशिष्ट नाळ जोडली गेली होती. त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ते मार्गदर्शन करत. शेतीचा सातबारा आणेवारी या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. बारामती वकील संघटनेचा आधारवड हरपला असल्याच्या भावना वकील संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.