मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेत आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. संजय पांडे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडेल. दरम्यान, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले संजय पांडे यांनी राजकीय इनिंग सुरु केली आहे.