पाकिस्तान: माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान सैन्याबद्दल मोठे विधान केले आहे. जर मला अल्लाहने अधिकार दिला तर मी स्वत: गवत खाईन, परंतु सैन्याच्या बजेटमध्ये निश्चितच वाढ करीन. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
अख्तर म्हणाले की, देशातील नागरिक सैन्याबरोबर एकत्र का काम करू शकत नाहीत हे मला समजत नाही. माझ्याकडे अधिकार असता तर मी लष्करप्रमुखांसमवेत बसलो असतो आणि बजेट 20 % असेल तर ते मी वाढवून 60% केला असता. जर आपण एकमेकांचा अपमान करत राहिलो तर आपले नुकसान आपोआप होईल.
1999 च्या कारगिल युद्धानंतर मी आपल्या देशासाठी लढण्यास तयार होतो, असा दावाही शोएब अख्तरने मुलाखतीत केला होता. त्यानंतर त्यांनी काउन्टी क्रिकेटसाठी कोट्यावधी रुपयांचा करार फेटाळून लावला होता.
अख्तर काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरस विरूद्ध युद्धासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका आयोजित करण्याविषयी बोलले होते. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही अख्तरचे समर्थन केले. तथापि, माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्यासह अनेक खेळाडूंनी अख्तरचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला होता.