भुवनेश्वर : जनतेशी वागताना पोलिसांच्या उदासीनतेच्या निषेधार्थ निवृत्त पोलिस अधिक्षकाने बुटपॉलिश करत आहेत. ओडिसाच्या किनारावर्ती बालासोर जिल्ह्यात हे अभिनव आंदोलन करत आहेत.
निवृत्त अन्वेषण अधिक्षक उज्ज्वलकुमार ब्रम्हा हे बालासोरच्या विविध भागात बुटपॉलिश करून पोलिसांच्या उदासीनतेचा निषेध करत आहेत. बालासोरच्या पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयापुढे त्यांनी सोमवारी बुटपॉलीश केले.
मी विविध पोलिस ठाण्यात सेवा केली. 2010मध्ये मी भूनवेश्वरमधून गुन्हे अन्वेषण अधिक्षक म्हणून निवृत्त झालो. पोलिस कसे काम करतात आणि सामान्य माणसांना कसा त्रास देतात, ते मला माहित आहे. निवृत्त झाल्यावर मी एका सामान्य नागरिकाची तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात गेलो. त्यावेळी पोलिस ती तक्रार स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिस खात्याला पॉलिश करण्याची गरज आहे, असे मला वाटले. त्यामुळे मी हे आंदोलन सुरू केले. या माजी अधिकाऱ्याने 2 ऑक्टोबरपासून तीन वेळा हे आंदोलन केले आहे, असे ब्रम्हा म्हणाले.
भाग्यविधात्या पुढचे पोलिस असे पुस्तकही त्यांनी ओडीया भाषेत लिहले आहे. त्यात सामान्य नागरिकांना पोलिस त्यांची ताकद कशी दाखवतात याबद्दल लिहण्यात आले आहे. माझ्या काळात मी माझ्या सेवेचा आनंद घेत जनतेची सेवा केली. त्यामुळे लोकांचाही आम्हाला पाठिंबा मिळाला. आता मी पाहतो तर पोलिस वेळेवर पोलिस ठाण्यात वेळेत पोहोचतही नाहीत.कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा फार कमी आदर उरला आहे, असेही हा निवृत्त अधिकारी म्हणाला.