वेलिंग्टन – न्यूझीलंडचे माजी कसोटी क्रिकेटपटू जॉन रीड ( John F Reid )यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. 1985 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेनच्या गाब्बा येथे झालेल्या व न्यूझीलंडने डावाने जिंकलेल्या विजयी कसोटी सामन्यात त्यांची शतकी खेळी प्रचंड गाजली होती.
त्या सामन्यात रीड यांनी मार्टिन क्रो याच्यासह द्विशतकी भागीदारीही केली होती. हा सामना न्यूझीलंडने एक डाव 41 धावांनी जिंकला होता. याच सामन्यात सर रिचर्ड हॅडली यांनी ऑस्ट्रेलियाचे पहिल्या डावात 9 तर, दुसऱ्या डावात 6 गडी बाद केले होते.
त्यांनी न्यूझीलंडकडून 1979 ते 1986 या कालावधीत 19 कसोटी सामने खेळताना 6 शतके व 2 अर्धशतके फटकावलेली आहेत. त्यांनी 25 एकदिवसीय सामनेही खेळले होते.