पाकिस्तानकडून कसाबला संपवण्याची जबाबदारी दाऊदवर

राकेश मारिया यांच्या पुस्तकातील खळबळजनक खुलासा

मुंबई : मुंबईवर 2008 मध्ये केलेल्या 26/11च्या हल्ल्यात सापडलेला एकमेव आरोपी अजमल कसाबला कारागृहात संपवण्याची जबाबदारी दाऊद इब्राहीमवर सोपविली होती. त्यासाठी त्याच्या दिमतीला आयएसआय आणि लष्कर ए तय्यबा या संघटना होत्या, असे अनेक धक्कादायक खुलासे या हल्ल्याचे तपास करणारे अधिकारी राकेश मारीया यांनी केले आहेत.

राकेश मारीया यांनी लेट मी से इट नाऊ यता आपल्या पुस्तकात म्हटले आहे, 26/11चा हा कट प्रत्यक्षात दोन महिने आधी रमजानच्या महिन्यात करण्यात येणार होता, असा दावा मारीया यांनी या पुस्तकात केला आहे. हा 26/11 च्या हल्ल्याचा कट प्रत्यक्षात रमझान उपवासाच्या महिन्यात 27 व्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला अंमलात आणला जाणार होता. मात्र प्रत्यक्षात तो पुढे ढकलून 26 नोव्हेंबरला अंमलात आणला, असे या पुस्तकात मारीया म्हणतात.

कसाबची हिंदू ओळख
लष्कर ए तय्यबाचा अतिरेकी अजमल अमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. त्याची ओळख हिंदु पटवण्याची योजना लष्करने आखली होती. त्याला ठार मारून त्याला बंगळूरूचा रहिवासी समीर दिनेश चौधरी अशी त्याची ओळख द्यायची होती. त्याच्या हाताला लाल गंडा त्याच हेतूने गुंडाळण्यात आला होता. मात्र हा कट प्रत्यक्षात आला नाही. पोलिसांनी कसाबला जिवंत पकडले. तो फरीदकोटचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

दाऊदकडे कसाबला मारण्याची सुपारी
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि आणि लष्कर ए तय्यबाच्या मदतीने कसाबला ठार मारण्याचे काम दाऊदवर सोपवण्यात आले होते. त्याद्वारे त्यांना या नृशंस गुन्ह्यातील पाकिस्तानचा असणाऱ्या सहभागाचा पुरावा संपवायचा होता. दाऊदने घडवलेले 1993चे स्फोट ओण 2008चे हल्ले या दोन्ही प्रकरणांचा तपास मारीया यांनी केला होता. मारीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसाबची सुरक्षा ही माझ्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. विशेषत: मुंबई पोलिसांमध्ये त्याच्या विषयी असणारा राग आणि तिरस्कारामुळे याला प्राधान्य दिले होते. याशिवाय त्याला बाहेरचे धोके होतेच. सुमारे 60 तास चाललेल्या या दहशतवादी नाट्यात मुंबईचे 16 पोलिस कर्मचारी आणि दोन एनएसजी कमांडो शहीद झाले होते. 26/11च्या हल्ल्यात 26 विदेशींसह 150 नागरिक मरण पावले होते.

बनवाट ओळखपत्रे
26/11च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना हैदराबादच्या अरूणोदय महाविद्यालयाची बनावट ओळखपत्रे दिली होती. असेच ओळखपत्र कसाबला दिले होते. कसाब आणि त्याचा मित्र लाल खान तयांनी आर्थिक दारीद्रय दूर करण्यासाठी तय्यबात सहभागी झाले होते. त्यांचे जिहादशी काही देणे घेणे नव्हते, असेही त्यांनी नमुद केले आहे.

कसाबची दिशाभूल
कसाबच्या अटकेनंतर त्याची तपासणी करताना त्याने सांगितले की, भारतात मुस्लिमांना नमाज पडण्यास बंदी आहे. मशिदींना कुलूप लावले आहे, असे त्याच्या मनावर बिंबवले गेले होते. त्याच्या मनातील हा समज दूर करण्यासाठी मारीया यांनी तपास पथकातील अधिकारी रमेश महाले यांना त्याला एका वाहनातून त्याला मेट्रो सिनेमाजवळील मशिदीत नमाज दाखवण्यास सांगितले. त्याने त्याची तयारी पाहून आणि रोज कारागृहात ऐकू येणारी अझान ऐकून त्याला फसवणूक केली असल्याचे लक्षात आले.

कसाब जनाब म्हणायचा
कसाबला अटक केल्यानंतर त्याची अनेक दिवस मी तपासणी घेत असे. त्यातून दहशतवादी हल्ले करणाऱ्यांची मानसिकता मला उलगडत गेली. रोजच्या संभाषणातून आमच्यात एक बंध निर्माण झाला. तो मला लवकरच जनाब म्हणून हाक मारू लागला,असे मारीया यांनी म्हटले आहे. कसाबला त्याच्यावर भारतीय न्यायलयात पूर्ण खटला चालवून पुण्यातील येरवडा कारागृहात 21 नोव्हेंबर 2012 ला फाशी देण्यात आले. त्याच्यावर अज्ञात ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.