मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. राऊतांच्या या विधानावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. ”त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा राऊतांनी स्वतःची किंमत ओळखली.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
निलेश राणे म्हणाले की, ”संजय राऊत मुर्ख आहेत. आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या लायकी नुसार नुकसानाची किंमत ठरते. त्यांनी ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा राऊतांनी स्वतःची किंमत ओळखली.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सजंय राऊतांवर आरोप केले होते. ते आरोप आज राऊतांनी फेटाळत या आरोपांबद्दल आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहोत. असे ते म्हणाले होते. त्यावर निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.