माजी खासदार म्हटलेलं खैरेंना आवडेना

मुंबई : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना माजी खासदार म्हणणे मान्यच नसल्याची परिस्थिती आहे. त्याचा परिचयही औरंगाबादकरांना आला आहे. औरंगाबद मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खैरे यांचा, माजी खासदार असा उल्लेख केलेला खैरेंना चांगलेच खटकले आहे. ‘आल्यापासून पाहतोय, माझा उल्लेख माजी खासदार-माजी खासदार म्हणून केला जातोय’. पण मी आजही शिवसेनेचा नेता असून लोकं माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात. असे म्हणत खैरेंनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे खासदार जलील यांच्याकडून झालेला पराभव अजूनही खैरेंना पचलेला दिसत नाही अशी चर्चा आता औरंगाबाद मध्ये रंगली आहे.

दरम्यान औरंगाबाद मध्ये ‘क्रेडाई’चा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शहरातील बऱ्याच राजकीय मंडळींची उपस्थिती होती. खैरेंच्या भाषणापूर्वी त्यांचा माजी खासदार म्हणून उल्लेख केल्याने ते चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी कार्यक्रमात आल्यापासून माझा उल्लेख माजी खासदार म्हणून सतत केला जात आहे. मी खासदार होतो हे सत्य असले तरीही, मी आजही एक शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे दररोज लोकं काम घेऊन माझ्या कार्यलयात येत असतात. असे म्हणत  खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यानंतर बोलतांना खासदार जलील यांनी मी “खासदार झालो यावर अजूनही काही लोकांचा विश्वास बसलेला नाही”. असे म्हणत खैरेंना टोला लगावला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)