MNS leader Meets Devendra Fadanvis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील ‘सागर’ बंगल्यावर पोहचले होते. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. रविवारी नागपूरात राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पाडला जाण्याची माहिती आहे. त्यातच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीमागचं कारण काय ?
मात्र ही भेट वैयक्तिक कारणास्तव असल्याचे समोर आले आहे. राजू पाटील आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी गेल्याची माहिती आहे. राजू पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील आणि भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला होता. साखरपुड्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती.
विधानसभा निवडणुकीत पराभव
राजू पाटील हे गेल्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव मनसे आमदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अमित ठाकरेंसह मनसेच्या सर्वच शिलेदारांचा पराभव झाला. हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. MNS leader Meets Devendra Fadanvis |
दरम्यान, ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानला पार पडला. या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रित केले होते. परंतु वैयक्तिक कारणासाठी राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. MNS leader Meets Devendra Fadanvis |