जळगावमध्ये माजी मनसे शहर उपाध्यक्षाची निघृण हत्या

जळगाव: मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष शाम दीक्षित यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील अत्यंत व्यस्त असणाऱ्या रचना कॉलनी येथील साईबाबा मंदिराच्या आवारातच ही घटना घडल्याने शहरात तणावग्रस्त वातावरण झाले आहे.

ही हत्या दारुच्या नशेत झालेल्या वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

मयत शाम दीक्षित हे मनसेचे माजी जळगाव शहर उपाध्यक्ष होते. तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प वेंडर म्हणून ते काम करत होते. काल दहीहंडीच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत ते मित्रांसोबत होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर मित्रांसोबत दारुच्या नशेत त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्यांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांना संशियत आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच सहा ते सात जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नटावदे यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×