राजूर – जागतिक आदिवासी दिन यंदाहीत राजूर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. झांज, लेझीम, टिपरी, कोंबड नृत्य, पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते.
आदिवासी लोककलेचे दर्शन घडवत माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरमध्ये जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. आपल्या समाजाच्या रुढी आणि परंपरा बालपणापासूनच रुजविण्यासाठी पिचड यांनी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या सर्व आश्रम शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या मिरवणुकीत सहभागी केले होते. याबरोबरच कुमशेतपासून ते घाटघरपर्यंत अनेक समाज बांधवांनी उत्स्फर्तपणे या मिरवणुकीत हजेरी लावली.
माजी आमदार वैभव पिचड यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. झांज, लेझीम, टिपरी, कोंबड नृत्य, पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते. ज्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला तोंड देताना प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे.
अकोल्यात आज होणारा जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव हा स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी व पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साजरा होत असल्याचा टोला वैभव पिचड यांनी आमदार लहामटे यांना लगावला. यावेळी गुरुवर्य रा.वि .पाटणकर सर्वोदय विद्यामंदिरचे विद्यार्थी यांनीही आदिवासी दिन फेरी काढून साजरा केला. याप्रसंगी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे, आदर्श सरपंच हेमलता पिचड, मंगलदास भवारी, सी. बी. भांगरे, विठ्ठल भवारी, अनंत घाणे, सुनील सारुक्ते, पांडुरंग खाडे, सयाजी अस्वले, गंगाराम धिंदळे, दौलत देशमुखसह आदिवासी बांधव उपस्थित होते. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.