राजगुरूनगर – खेड तालुक्याचे माजी आमदार ‘सुरेश गोरे’ यांचे कोरोना उपचारा दरम्यान पुण्यात निधन झाले आहे. सुरेश गोरे हे 57 वर्षांचे होते. करोना काळातही त्यांनी न डगमगता समाजकार्य सुरू ठेवले होते. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्यातील रुबी हाॅल रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली. एक शांत राजकीय व हासमुख व्यक्तीचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.