पुणे ( प्रतिनिधी ) : सोसायटीजवळ दारू पीत बसलेल्या युवकांना नागरिकांनी हटकल्यावरून झालेल्या वादात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दारुडयाकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यावेळी कुलकर्णी यांच्या हाताची दोन बोटं फ्रॅक्टर झाले आहेत. याप्रकरणी पोलिसानी दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. कोथरूड भागातील साहजानंद सोसायटी जवळ शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
अमर सयाजी बनसोडे (वय २६), विनोद सुरेश गेंदे (वय २६) आणि रोहिदास उर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय १९, तिघेही रा. गणजय सोसायटी, कोथरूड) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.