पुणे – ज्येष्ठ दांम्पत्यास किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्यांना गुन्हयात अटक केली.
याप्रकरणी अमन चढ्ढा (बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार हर्षवर्धन जाधव व एका महिलेवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांचे आई-वडिल हे औंध येथून सोमवारी रात्री दुचाकीवरुन चालले होते. यावेळी हर्षवर्धन यांनी त्यांच्या कारचा दरवाजा अचानक उघडला. यामुळे फिर्यादी यांच्या आईच्या पायाला मार लागला.
याचा जाब त्यांच्या वडिलांनी हर्षवर्धन यांना विचारला. याचा राग येऊन हर्षवर्धन त्यांच्यावर धावून गेले. त्यांनी आपन ह्दयरोगी असून शस्त्रक्रीया झाली असल्याचे हर्षवर्धन यांना सांगितले. मात्र तरीही हर्षवर्धन यांनी अमन यांच्या वडिलांना छातीमध्ये व पोटामध्ये लाथा मारल्या. तर त्यांच्या आईसही लाथा मारुन जखमी केले.
हर्षवर्धन हे औरंगाबादचे माजी आमदार आहेत. तर त्यांच्या सोबतच्या महिलेचे वय 37 असून ती वाकड येथे रहाते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दहिफळे तपास करत आहेत.