माजी मिस इंडियाची छेड ; सात जणांना अटक

कोलकाता: माजी मिस इंडिया युनिव्हर्स उशोषी सेनगुप्ता हीचा भररस्त्यात पाठलाग करून तिची छेड काढऱ्या सात जणांच्या टोळक्‍याला कोलकाता पोलिसांनी आज अटक केली. सेनगुप्ता या आपल्या कामाच्या ठिकाणाहून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या सात जणांनी त्यांची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमाराला घडला.

हा प्रकार त्यांनी फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या सात जणांना अटक केली. सेनगुप्ता या सन 2010 च्या ब्युटी कॉन्टेस्ट मधील मिस इंडियाच्या मानकरी ठरल्या आहेत. या प्रकाराविषयी माहिती देताना त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की मी माझे नियमीत काम आटोपून माझ्या सहकाऱ्यासह कॅब मधून घराकडे परतत असताना या तरूणांनी माझ्या गाडीचा पाठलाग केला. त्यांनी आमच्या कॅबला त्यांच्या मोटारसायकली आडव्या घालून आमची कॅब थांबवली त्यांनी कॅब चालकाला धक्काबुक्की केली.

या प्रकरणी आपण रात्रीच मैदान पोलिस स्टेशन आणि चारू मार्केट पोलिसांकडे जाऊन त्यांची मदत घेतली. पण त्यांनी हा प्रकार आमच्या हद्दीत झाला नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकली. ज्या जवाहरलाल रोडच्या चौकात हा प्रकार घडला त्यावेळी मी कॅबच्या बाहेर येऊन तेथे केवळ 50 मीटर अंतरावर असलेल्या पोलिसाला मदतीसाठी ओरडून बोलावले पण ते मदतीसाठी आले नाहीत. नंतर काहीं पोलिस कर्मचारी तेथे आले पण टवाळखोर तेथून पळून गेले. त्यानंतर आम्ही कॅबने घरी निघलो तेव्हाही सहा जणांनी आमची कॅब पुन्हा अडवली व त्यांनी मला बाहेर खेचून माझा मोबाईल पळवण्याचा प्रयत्न केला. त्यात मी या प्रकाराचे व्हिडीओ चित्रण केले होते ते त्यांना नष्ट करायचे होते. कोलकाता पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन या टोळक्‍यातील सात जणांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)