जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे (वय ८०) यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.
एक प्रामाणिक शेतमजूर, सालकरी, ते कँबिनेट मंत्र्याचे वडील म्हणून त्यांनी आपले नाव मिळवले. मूलगा मंत्री झाला तरी कै शंकर शिंदे यांनी स्वतः मध्ये कोणताही बडेजाव ठेवला नाही. एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाला आपुलकीने वागणूक दिली. गेल्या काही दिवसापासून ते अजारी आसल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. अखेर शनिवार दि ४ रोजी दुपारी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कै. शंकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता कळताच जामखेड- कर्जत मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मूलगा माजी मंत्री प्रा.राम शिंदे, चार मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. कै शंकर शिंदे यांचा अंत्यविधी रविवार दि ५ रोजी सकाळी ९ वा त्यांच्या मूळगावी चौंडी येथे होणार आहे.