तळेगाव दाभाडे, दि. 8 – मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे वय 73 यांचे हृदय विकाराने गुरुवारी (दि.8) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या छातीत दुखत असल्याने बुधवारी (दि.7) रात्री दहा वाजता सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.त्यांचे गुरुवारी (दि.8) दुपारी निधन झाले. त्यांच्यावर इंदोरी कुंडमळा इंद्रायणी नदीकाठी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी मावळ विधानसभा निवडणूक १९९९ व २००४ भाजपच्या वतीने निवडून आले होते. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष होते. वारकरी संप्रदायात ते अग्रेसर असून बैलगाडा शौकीन होते. त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, दोन भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
बैलगाडा विमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे यांचे भाऊ होत.प्रगतशील शेतकरी मनोहर भेगडे व प्रशांत भेगडे यांचे ते वडील होत. भाजप मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे ते चुलते होत.