माले – मालदिवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद गुरुवारी रात्री एका एका बॉम्बस्फोटामध्ये जखमी झाले. हा एक दहशतवादी हल्ला होता, असे मालदिवच्या पोलिसांनी आज सांगितले. आतापर्यंत या प्रकरणी कोणाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी रात्री झालेल्या घराबाहेर झालेल्या स्फोटात 53 वर्षीय नशीद जखमी झाले आणि राजधानी माले येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची जखम जीवघेणी नाही, असे गृहमंत्री इम्रान अब्दुल्ला यांनी एका स्थानिक टेलिव्हिजनला सांगितले. नशीद हे मालदिवमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले अध्यक्ष आहेत आणि 2008 ते 2012 पर्यंत ते अध्यक्ष होते.
हा एक दहशतवादी हल्ला होता असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र बॉम्बच्या स्वरुपाबद्दल अथवा संशयिताबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुणी घेतलेली नाही. स्फोटानंतर सोशल मिडीयावर पोस्ट झालेल्या घटनास्थळाच्या फोटोंमध्ये छिन्नविछिन्न झालेली एक मोटरसायकल दिसत आहे.
या बॉम्बस्फोटाच्या तपासास मदत करण्यास तयार आहेत, असे ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी सांगितले आहे आणि ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस तपास करणारे शनिवारी दाखल होतील, असे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी टिव्हीवरील भाषणात सांगितले.
प्रामुख्याने सुन्नी मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मालदिवमधील धार्मिक कट्टरवादावर नशीद स्पष्ट शब्दात टीका करत असत. जिथे इतर धर्मांचे उपदेश करणे आणि पालन करण्यावर कायद्याने बंदी घातली गेली आहे. मालदिवमधील रहाणीमान अतिशय ऐषोआरामाचे मानले जाते. तेथे हिंसक कारवायांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. 2007 मध्ये राजधानी मालेच्या एका पार्कमध्ये झालेल्या स्फोटात 12 विदेशी पर्यटक जखमी झाले होते. तेथे आतापर्यंत झालेला हिंसाचार धार्मिक कट्टरवादातूनच झाला आहे. सीरिया आणि इराकमध्ये लढणारे बहुसंख्य दहशतवादी मालदिवमधील असल्याचे मानले जाते.
वाढत्या दहशतवादी कारवाया…
गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ जणांच्या गटाने शाळेवर हल्ला करण्याचा कट केला होता आणि समुद्रात एका बोटीमध्ये बॉम्ब तयार करण्याचीही त्यांची योजना होती, असे मालदीवच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीत जाहीर केले होते. दहशतवाद्यांनी निर्जन बेटांवर लष्करी प्रशिक्षणदेखील घेतले आणि मुले भरती केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. नशीद यांनी देशातील एकाधिकारशाहीचे उच्चाटन केले मात्र त्यांच्याविरोधात आंदोलन झाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्याचा पराभव झाला आणि तुरूंगात राहण्याच्या शिक्षेच्या कालावधीमुळे 2018 च्या निवडणूकीत सहभाग घेण्यास ते अपात्र ठरले होते. 2019 च्या निवडणूकीत ते संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.