BREAKING : मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद बॉम्बस्फोट हल्ल्यात जखमी

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केली चिंता

माली – मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद हे आज राजधानी माली येथे झालेल्या एका स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मालदीव पोलिसांतर्फे देण्यात आली असून पीपल्स मजलिसचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या नशीद यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.  

प्राप्त माहितीनुसार, नशीद हे त्यांच्या गाडीमध्ये बसत असताना हा स्फोट झाला. 

मालदीव पोलिसांनी याबाबत ट्विटरवर माहिती देताना, नागरिकांनी स्फोट झालेल्या भागामध्ये जाणे टाळावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘अशाप्रकारच्या भ्याड हल्ल्यांना आपल्या समाजामध्ये जागा नाही. या स्फोटात जखमी झालेले नशीद व इतरांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो.’ असं म्हंटल.   

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांची प्रतिक्रिया 

नशीद यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली. नशीद लवकरात लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. अशा हल्ल्यांमुळे नशीद कधीही भयभीत होणार नाहीत असंही परराष्ट्रमंत्री म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.