मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीमध्ये काही दिग्गजांसह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.यामध्ये भाजपने पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक
गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाणांच्या कन्येची राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता त्यांना भाजपने संधी दिली आहे. त्या भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता महाविकास आघाडी या ठिकाणी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नांदेडमध्ये पोटनिवडणूक
नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर आता भाजप कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.