पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीठासीन अधिकारी या पदावर मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. एल. वडणे यांची तीन वर्षांच्या कालवधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे शासन निर्णय नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पीठासीन अधिकाऱ्यांचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील तरतुदीनुसार नवीन पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती अनिवार्य आहे. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून पुणे विद्यापीठात पीठासीन अधिकारी हे पद रिक्त होते. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणांना गती मिळत नव्हती. त्याचा परिणामी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होत होता. आता के. एल. वडणे यांची नियुक्ती झाल्याने प्रकरणे लवकरच मार्गी लागतील, असे चिन्हे आहेत.
असे असेल कामकाज
विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असेल, त्यांना विद्यापीठातील न्यायाधीरणाकडे दाद मागता येतो. त्यात दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर न्यायमूर्तीं आपला निर्णय देतात. त्यामुळे अन्याय झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत केला जाते. त्यादृष्टीने हे पद शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.