बिहार – बिहार येथील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) उमेदवार म्हणून कन्हैया कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी चौथ्या टप्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
बेगूसराय येथे कन्हैया कुमार यांच्यासमोर भाजपचे गिरिराज सिंह आणि आरजेडीचे तनवीर हसन याचं आव्हान असणार आहे.
कन्हैया कुमार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जीरोमाइलमध्ये राष्ट्रकवी दिनकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कन्हैया कुमार यांना समर्थन देण्यासाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी सुध्दा उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, जेएनयू विद्यार्थी संघटनेतील कन्हैया यांचे साथीदार शेहला राशिद, गुरमेहर हे देखील उपस्थित होते.
अम्मा फ़ातिमा नफ़ीस, जिग्नेश, शेहला, गुरमेहर समेत उन तमाम साथियों का शुक्रिया जो संविधान और लोकतंत्र को बचाने के संघर्ष को मज़बूत करने के लिए बेगूसराय आए हैं। जहाँ देखो वहाँ हमारे साथी लाल झंडों के साथ नज़र आ रहे हैं। एकजुटता का ऐसा भव्य नज़ारा सबमें जोश भर रहा है। pic.twitter.com/0lkW4FAFF9
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) April 9, 2019