भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी प्रशिक्षक भवानी मुखर्जी यांचे निधन

चंदीगड : भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी प्रशिक्षक भवानी मुखर्जी याचे शुक्रवारी निधन झाले आहे. ते ६८ वर्षाचे होते. भवानी मूखर्जी यांनी चंदीगड जवळील जीरकपूर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही काळापासून आजारी होते.

टेबल टेनिसमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे भवानी मूखर्जी हे पहिले प्रशिक्षक होते. त्यांनी अजमेर येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते. कोचिंगमध्ये डिप्लोमा केल्यानंतर ७० दशकाच्या मध्यात ते पटियाला मध्ये राष्ट्रीय खेल संस्थानशी ( एनआयएस) जोडले गेले होते. ते एनआयएस पटियाला मध्ये मुख्य प्रशिक्षक होते आणि २०१० राष्ट्रमंडल खेळानंतर ते काही काळासाठी राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

मूखर्जी लंडन आॅलम्पिकवेळी खेळाडूसोबत गेले होते. सुमारे ३४ वर्षे टेबल टेनिससाठी काम केल्यानंतर ते भारतीय खेल प्राधिकरण मधून सेवानिवृत्त झाले. मूखर्जी यांना २०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते, टेबल टेनिस क्रीडाप्रकारात हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले प्रशिक्षक होते.

Leave A Reply

Your email address will not be published.