आता सीबीआयच्या रडारवर अनिल देशमुख; बुधवारी होणार चौकशी

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून आज(सोमवार) समन्स बजावण्यात आले आहे. यानुसार अनिल देशमुख यांची आता बुधवार 14 एप्रिल रोजी चौकशी होणार आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात धाव घेणाऱ्या अनिल देशमुख आणि राज्य सरकारला या अगोदर दिलासा मिळालेला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.

देशमुख यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 15 दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.